• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Saturday, March 7, 2026
Ajinkya Yodha
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
Ajinkya Yodha
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
Home राजकारण

धुळे खरेदी विक्री संघात जवाहर पॅनलचा विजय

आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची भाजपा प्रणित पॅनलला धोबीपछाड

ajinkyayodha by ajinkyayodha
11/04/2025
in राजकारण
0
धुळे खरेदी विक्री संघात  जवाहर पॅनलचा विजय
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

धुळे अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क

धुळे जिल्ह्यात प्रतिष्ठेची असणाऱ्या धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या निवडणूकीत आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या जवाहर शेतकरी विकास पॅनलने भाजपा प्रणित पॅनलचा धुव्वा उडवला.जवाहर गटाने सर्व 15 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपाच्या पॅनलला धोबीपछाड दिली आहे. तर यापूर्वीच जवाहर पॅनलच्या दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. या निवडणूकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. तर धुळे ग्रामीण मध्ये भाजपाच्यावतीने आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना या निकालामुळे धक्का बसला आहे.

धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रीया सोसायटीच्या निवडणूकिसाठी आज गुरुवार धुळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय येथे मतदान झाले.मतदानानंतर लगेच सायंकाळी 4 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणूकित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणित जवाहर शेतकरी विकास पॅनल आणि माजी खा. डॉ.सुभाष भामरे यांच्या भाजपाच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलतर्फे दोन उमेदवार बिनविरोध झाले होते. उर्वरित 15 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकित आ.कुणाल पाटील यांच्या पॅनलच्या सर्व म्हणजे 15 उमेदवारांचा प्रचंड मताधिक्क्याने दणदणीत विजय झाला. भाजपाच्या उमेदवारांना पुन्हा एकदा पराभवाची धुळ चाखावी लागली आहे.

*जवाहर पॅनलचे विजयी उमेदवार*

जवाहर शेतकरी विकास पॅनलचे बापू नारायण खैरनार(मते 106), गवळी संभाजी सिंधुजी(मते 108), गिरासे इंद्रसिंग नथुसिंग(मते 102), चौधरी विलास वंसतराव (मते 107), नांद्रे रमेश दत्तात्रय( मते 105), पाटील कैलास हिंमतराव ( मते 109), पाटील दिनकर दौलत ( मते 109), पाटील भटू गोरख( मते 104), पाटील रोहिदास विठ्ठल ( मते 103), मराठे चुडामण सहादू ( मते 101), पाटील पंढरीनाथ बुधा ( मते 545), चौधरी सुशिलाबाई भगवान ( मते 542), पाटील अनिता योगेश ( मते 550), पाटील लहू काशिनाथ ( मते 426), पाटील सुनिल यादवराव( मते 389) हे सर्व उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
जवाहर पॅनलचे दोन उमेदवार माघारीअंती आधीच बिनविरोध निवडून आले होते. विरोधी भाजपा प्रणित पॅनलला दोन जागांवर उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून पोपट सहादू शिंदे रा.उडाणे आणि अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून अरविंद भालचंद्र शिरसाठ रा.धनुर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

*विजयी जल्लोष*

जवाहरचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण,फटाक्यांच्या आतीषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. दरम्यान आ.कुणाल पाटील आणि चि.रायबा कुणाल पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मतमोजणी केंद्रापासून ते आ.पाटील यांच्या घरापर्यंत विजयी मिरवणूक निघाली होती.

*शेतकरी व सभासदांचा विजय- आ.कुणाल पाटील*

जवाहर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय शेतकरी आणि सभासदांनी टाकलेल्या विश्‍वासामुळे झाला आहे. त्यामुळे हा विजय शेतकरी व सभासदांचा असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी आपल्या सांगितले. विजयी मिरवणूकीनंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ.पाटील यांच्या देवपूर येथील संपर्क कार्यालयातील सभागृहात झालेल्या विजयी सभेत ते बोलत होते. दरम्यान खरेदी विक्री सोसायटीचा कारभार उत्तमप्रकारे सुरु असून येत्या पाच वर्षात महाष्ट्रातील अव्वल दर्जाची खरेदी विक्री सोसायटी करुन दाखवेल. शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जातील. शेतकर्‍यांचा जास्तीत जास्त शेतीमाल खरेदी करुन रास्त भाव देण्याचा प्रयत्न केले जातील.त्यामुळे शेतकर्‍यांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही असेही आ.पाटील यांनी सांगितले.

*मविआची विजयाची हॅट्रिक*

धुळे बाजार समिती व धुळे लोकसभेतील पराभवानंतर खरेदी विक्री सोसायटीच्या निवडणूकीत भाजपाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. खरेदी विक्री संघावर विजय मिळवित आ.कुणाल पाटील यांचे धुळे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. तर महाविकास आघाडीची जिल्ह्यात विजयाची हॅट्रिक झाली आहे.

*भावी आमदारांना दणका*

खरेदी विक्री संघाची ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. यासाठी धुळे तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदारकीचे स्वप्न पाहणारे अनेक जण एकत्र आले होते. या निवडणुकीच्या कारणावरून भ्रष्टाचाराचे आरोप करून या भावी आमदारांनी सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. मात्र सभासदांनी त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला दणका दिला आहे.

Previous Post

रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे अफलातून दिग्दर्शक चेतन आनंद

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

Related Posts

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

11/04/2025
तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

11/04/2025
काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

11/04/2025
दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

11/04/2025
सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

11/04/2025
Next Post
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

ADVERTISEMENT

ताज्या घडामोडी

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

11/04/2025
बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

11/04/2025
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

11/04/2025

सर्वाधिक पसंतीचे

  • जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्या नंतरचा मतदानाचा अभिनव प्रयोग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि कुणाल पाटलांकडून धीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    0 shares
    Share 0 Tweet 0

About Ajinkya Yodha

Ajinkya Yodha News Portal websites typically cover a wide range of news topics, including local and national news, as well as Educational, sports, entertainment, Crime, politics, business, and culture, etc.

Site Visitors:

Browse by Category

  • आरोग्य
  • कृषी
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • विचार विश्व
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Recent News

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group