धुळे- अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क
जनतेच्या हितासाठी काम करणार्या इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले पाहिजे, इंडिया आघाडीतील नेते,पदाधिकारी निवडणूकीतील उमेदवार हे सेवा आणि समर्पण भावनेने काम करीत आहेत. त्यामुळे
सेवा आणि समर्पण भावनेतून जनतेसाठी काम करणार्या इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी धुळ्यात केले
नंदुरबार लोकसभेतील इंडिया आघाडीचे उमेदवार अॅड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जाहिर सभेचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेनिमित्ताने त्यांचे खाजगी विमानाने धुळे येथील गोंदूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील तसेच सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रियंका गांधी यांनी धुळे लोकसभेतील उमेदवार डॉ.सौ.शोभाताई बच्छाव यांच्या निवडणूकीबाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान नंदुरबार येथील सभा आटोपून आल्यावर त्यांनी धुळे लोकसभेतील मतदारांना आवाहन करतांना सांगितले कि, जनतेच्या हितासाठी काम करणार्या इंडिया. आघाडीचे सरकार स्थापन झाले पाहिजे, इंडिया आघाडीतील नेते,पदाधिकारी निवडणूकीतील उमेदवार सेवा आणि समर्पण भावनेने काम करीत आहेत. त्यामुळे धुळे लोकसभेत डॉ.शोभाताई बच्छाव यांना बहूमतांनी विजयी करावे असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. यावेळी आ.कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करनकाळ, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, उमेदवार प्रतिनिधी डॉ.मयुरी बच्छाव, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव राहूल माणिक, बापू खैरनार,विजय चिंचोले, डॉ,ममताताई पाटील,डॉ.शैलेंद्र पाटील, बानुबाई शिरसाठ,भावना गिरासे, दिपक अहिरे, भैय्या चौधरी,राजेंद्र देवरे ,प्रकाश पाटील,प्रमोद सिसोदे, अलोक रघुवंशी,नरेंद्र पाटील, प्रशांत पदमोर,छाया पवार,तुषार गर्दे आदी उपस्थित होते.